|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची गोळ्य़ा झाडून आत्महत्या

सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची गोळ्य़ा झाडून आत्महत्या 

वार्ताहर/ वेणेगाव

छत्तीसगड राज्यातील बांदे (पखनंजोरे) जिल्हा कनकेर येथे सेवा बजावत असताना निसराळे  (ता.सातारा) येथील सीमा सुरक्षा दलाचा जवान प्रशांत दिनकर पवार यांने स्वत:च्या जवळ असणाऱया बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जवान प्रशांत पवार यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता निसराळे गावी येणार आहे.

जवान प्रशांत पवार यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठय़ा प्रमाणात होता. निसराळे येथे दसरा सणाला जवान प्रशांत पवार सुट्टीवर आले होते. तीन वर्षांपूर्वी नीलम यांच्याशी प्रशांत पवार यांनी विवाह करून आपला संसार सुरू केला होता. मात्र सुखी संसार हा अर्ध्यावर सोडून जवान पवार यांनी बांदे येथे सेवा बजावत असताना स्वतःच्या जवळच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. सुखी संसार हा नियतीला हे मान्य नसल्यामुळे पवार कुंटुबिय दुखा:च्या शोकसागरात बुडून गेले.

जवान प्रशांत पवार यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, एक विवाहित बहीण, दोन चुलते, आजी, आजोबा असा परिवार आहे. जवान प्रशांत पवार यांच्यावर मंगळवारी रात्री सीमा सुरक्षा दलाच्या वतीने मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.