|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » सामान्यांच्या गुंतवणुकीत 28 हजार कोटींची वाढ : मुख्यमंत्री

सामान्यांच्या गुंतवणुकीत 28 हजार कोटींची वाढ : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

नोटाबंदीनंतर कॉर्पोरेट बॉण्डमध्ये 2 कोटींची वाढ झाली असून सामान्यांच्या गुंतवणुकीत 28 हजार कोटींची वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त देशभरात सराकारकडून काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून काळा दिवस पाळला जात आहे.

‘कॅशलेस’ व्यवहार हे नोटाबंदीचे यश आहे. बँकेत आलेल्या संशयास्पद रकमेची चौकशी सुरू आहे. बँकेत आलेल्या काळय़ा पैशांची करवसुली सुरू आहे. नोटाबंदीमुळे बोगस कंपन्या उजेडात आल्या, तसेच सामान्यांच्या गुंतवणुकीत 28 हजार कोटींची वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.

 

Related posts: