|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » महेश देशपांडे यांना जिजाऊ जलमित्र पुरस्कार

महेश देशपांडे यांना जिजाऊ जलमित्र पुरस्कार 

नगर / प्रतिनिधी  :

 जलयुक्त शिवार अभियानाविषयी प्रभावी लेखन केल्याबद्दल 2015 – 16 वर्षा साठीचा विभागीय पातळीवरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार पत्रकार महेश महाराज देशपांडे यांना, तर सूर्यकांत नेटके यांची जिल्हा पातळीवर पुरस्कार जाहीर झाला आहे. धुळे येथे शनिवारी (दि.11 ) पुरस्काराचे वितरण होणार आहे. देशपांडे हे प्रतिनिधी आहेत.

 महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबीवण्यात येत आहे. या अभियानामध्ये चांगले काम करणाऱया अधिकारी, गावांचा त्याचबरोबर  प्रभावी लेखन करणाऱया पत्रकारांचाही राज्य सरकारतर्फे गौरव केला जात आहे. जनसंपर्क नाशिक विभागाने पत्रकारांसाठी दिले जाणारे जलमित्र पुरस्कार जाहीर केले आहेत. विभागीय पुरस्कारासाठी जे÷ पत्रकार महेश महाराज देशपांडे यांची, तर जिल्हा पातळीवर सूर्यकांत नेटके यांची निवड झाली आहे. महेश महाराज जामखेडचे सुपुत्र असून सूर्यकांत नेटके हे बीड जिह्यातील कोळेवाड़ी ता शिरूर कासार येथील आहेत. शनिवारी  (दि.11) रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांच्यासह जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे जिह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते धुळे येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागीय प्रमुख, नाशिक विभागातील पाचही जिह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित असतील. महेश महाराज देशपांडे व सूर्यकांत नेटके यांचे प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम. देशमुख यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.