|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हिंदूत्ववादी संघटनांचा कन्हैयाकुमारच्या सभेस विरोध

हिंदूत्ववादी संघटनांचा कन्हैयाकुमारच्या सभेस विरोध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांच्या बुधवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये झालेल्या सभेस समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी तिव्र विरोध केला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कन्हैयाकुमार यांच्या सभेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तर कार्यक्रम संपल्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबजी करत विरोध दर्शविला. पोलीसांनी सुमारे 35 कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून त्याची सुटका केली. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली.

   दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांची बुधवारी केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये सभा आयोजन करण्यात आले होते. या सभेस परवानगी देवूनये अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी दोन दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधीकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली होती. तर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेवून सभेस परवानगी देण्याची मागणी केली होती. संगीतसुर्य केशवरा भोसले नाटय़गृह प्रशासनाच्या वतीने पोलीसांनी परवानगी दिली तरच नाटय़गृह सभेसाठी उपलब्ध करून दिले जाईल अशी भूमिका घेतली होती. मंगळवारी रात्री उशीरा जिल्हाप्रशासनाच्या वतीने कन्हैयाकुमार यांच्या सभेस सशर्त परवानगी दिली होती. सभेस होणारा विरोध लक्षात घेवुन पोलीस प्रशासनाने संगीतसुर्य केशवराव भोसले नाटय़गृहाबाहेर मंगळवार रात्री पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

   बुधवारी सकाळीच नागेशकर व्यायामशाळा परिसरामध्ये हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले होते. विश्वहिंदू परिषदेचे संभाजी साळोखे, शिवानंद स्वामी, शरद माळी, सुधाकर सुतार, सुनील पाटील, अवधुत भाटे यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी 10. 30 वाजण्याच्या सुमारास हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांनी नाटय़गृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी  या कार्यकर्त्यांना रोखून धरले. कार्यकर्त्यांनी आम्ही कोणत्या पक्षाचे किंवा विचारसरणीचे नसून केवळ भाषण एwकण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. सभागृहामध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली, मात्र पोलीसांनी या कार्यकर्त्यांना आत सोडण्यास विरोध केला. यामुळे नाट्यगृहाबाहेरील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. यावेळी शहर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर हे घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांची समब्जूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी संघटनेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सभागृहामध्ये सोडण्याची मागणी अमृतकर यांच्याकडे केली. विद्यार्थी केवळ भाषण ऐकण्यासाठी आत जाणार आहेत. त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांना सभागृहामध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र शहर पोलीस उपाअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजकांकडून आतमध्ये जाण्यासाठी पास देण्यात आले आहेत. पास दाखवा आत सोडतो अशी भूमिका घेतली. यानंतर काही वेळातच सभास्थळी कन्हैयाकुमार यांचे आगमन झाले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी कडे करून आंदोलकांना रोखून ठेवले. ऑल इंडिया स्डुटंस फेडरेशनच्या स्वयंसेवकांनीही कन्हैयाकुमार यांच्या ताफ्याभोवती कडे करून त्यांना सभागृहामध्ये जाण्यास वाट मोकळी करून दिली. दरम्यान आंदोलकांनी सभगृहाबाहेर जोरदार निदर्शने करण्यास सुरूवात केली. त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तर काही कार्यकर्त्यांनी पोलीसांना चुकवत सभागृहामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी या आंदोलकांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

   सभासंपल्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी नाटय़गृहाबाहेर घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी कन्हैयाकुमार यांच्या वाहनाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी याही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सभागृहाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

   कन्हैयाकुमार यांच्या सभेस होणारा विरोध लक्षात घेवून पोलीसांनी केशवरा भोसले नाटय़गृहाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होत. शहर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक निशीकांत भुजबळ, तानाजी सावंत, संजय मोरे, संजय साळुंखे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी, राज्य राखीव दलाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

वनवे मोडला

  कन्हैया कुमार यांनी टाउन बाग परिसरातील सत्यशोधक गंगाराम कांबळे स्मृतिस्थळी भेट देवुन पुढे शिवाजी पुतळ्याकडे रवाना झाले. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून कन्हैयाकुमार यांचा ताफा थेट वनवेमोडून बिंदू चौक येथील भाकप कार्यालयाकडे रवाना झाला. कन्हैयाकुमार यांचा ताफा वनवेतोडून रवाना झाल्याने पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली. लक्ष्मीपुरी पोलीसांनी ताफ्यातील सर्व नंबर नोंद करून कारवाईसाठी ते शहर वाहतूक शाखेकडे पाठविण्यात आले.

Related posts: