|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » उद्योग » 7 हजार कोटीचे कर्ज माफ करावे

7 हजार कोटीचे कर्ज माफ करावे 

मायक्रो फायनान्स क्षेत्राकडून मागणी : नोटाबंदीने फटका बसल्याचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका रोख रकमेने होणाऱया क्षेत्रांवर दिसून आला. महिलांचे वर्चस्व असणाऱया सुक्ष्म आर्थिक संस्था आणि लहान व्यवसायांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. मायक्रो फायनान्स क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज असून यापैकी सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. नोटाबंदीने फटका बसल्याने कर्जमाफी करण्यात यावी असे या क्षेत्राचे म्हणणे आहे.

रोकडचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेल्या व्यवसायांवर नोटाबंदीचा सर्वाधिक वाईट परिणाम झाला आहे. हे क्षेत्र ग्रामीण भागात असल्याने सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागासाठी ठोस पतधोरण राबविण्यात नसल्याने त्याचा फटका या क्षेत्राला झाल्याचे एमएफआयएन या संघटनेच्या सीईओ रत्ना विश्वनाथन यांनी म्हटले. नोटाबंदीनंतर पहिल्या तीन महिन्यांत रोकड उपलब्ध न झाल्याचे अनेकांकडून देयके देण्यात आली नाही. याव्यतिरिक्त व्यवसायात मागणी घटतल्याने अनेकांनी या क्षेत्रातून लक्ष वळविल्याचे त्यांनी म्हटले. पहिल्या तीन महिन्यात लोकांनी थकीत ठेवत व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.

संघटनेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत कर्जाचे प्रमाण 10.8 टक्क्यांवर पोहोचले होते. वर्षापूर्वी हा आकडा केवळ 0.33 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत 30 दिवसांसाठी थकीत ठेवण्याचे प्रमाण 7.52 टक्क्यांवर पोहोचले होते. मागील वर्षापूर्वी हा आकडा 0.27 टक्के होता. नोटाबंदीनंतर आठ महिन्यांत हा आकडा वर्षापूर्वीच्या तुलनेत 0.32 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर पोहोचला होता.

जानेवारीनंतर या क्षेत्रात सुधारणा होत आहे. जानेवारीनंतर कर्ज फेडण्याचे प्रमाण 90 ते 95 टक्क्यांवर पोहोचले आहे. नोटाबंदीनंतर मायक्रो फायनान्स क्षेत्राला मोठा फटका बसण्याचे प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रात देयके देण्यासाठी कोणत्याही पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला नव्हता. मात्र या क्षेत्रातील स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे सांगण्यात आले.

बँकांना लाभ…

नोटाबंदी करण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बँकिंग क्षेत्रावर दिसून आला. नोटाबंदीनंतर एका वर्षाच्या कालावधीत 6.1 दशलक्ष बँक खाती उघडण्यात आली आहे. खातेदारांची शिलकी 80 टक्क्यांनी वाढत 480 कोटीवरून 884 कोटीवर पोहोचल्याचे एसबीआयचे संचालक अभिषेक पंडित यांनी म्हटले.

Related posts: