|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही

विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही 

प्रतिनिधी /आजरा :

पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासात सहकार चळवळीने दिलेल्या बहुमोल योगदानाला तोड नाही. खेडय़ांच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मत महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याचे निवृत्त अप्पर आयुक्त व पणन संचालक दिनेश ओऊळकर यांनी व्यक्त केले. आजरा येथील रवळनाथ हौसिंग सोसायटीच्या टिळकवाडी (बेळगांव) शाखेच्या वर्धापनदिन व शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांच्या सेवानिवृत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डाव्या चळवळीतील जेष्ठ नेते कॉ. कृष्णा मेणसे होते.

संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. प्रा. डॉ. अमित चिंगळी यांनी मानपत्र वाचन केले.

ओऊळकर म्हणाले, भारताने खुल्या आर्थिक धोरणाचा स्विकार केल्यानंतर गरीब आणि श्रीमंत यामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सहकारी संस्थेतील सभासदांना प्रशिक्षित करून ही चळवळ अधिक गतिमान करण्याबरोबरच सामुदायिक शेतीच्या प्रयोगातून शेतकऱयांना बळ देण्याची गरज असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कॉ. मेणसे यांनी सुमारे 2 हजार सभासदांना हक्काचे घर दिलेल्या रवळनाथची कामगिरी कौतुकास्पद असून तिच्या आगमनाने बेळगावची सहकार चळवळ अधिक समृद्ध झाली. प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह बेळगांवमधील असंघटीत लोकांसाठी केलेल्या कामाची नोंद रवळनाथने घेतली याचा आनंद झाला असून यापुढेही गरीब, उपेक्षित आणि वंचितासाठी अधिक वेळ देणार असल्याचे सांगितले.

Related posts: