|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » लोणी मावळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्युदंड

लोणी मावळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्युदंड 

अहमदनगर / प्रतिनिधी  :

पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी काल नराधम  आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तिघाही  आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे . या खेरीज  जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या आरोपींना सामूहिक बलात्कार, कट रचणे यासह अन्य  गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली . आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील रक्क्म मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. काल निकालाच्या वेळी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह स्थानिक गावकरी आणि  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ,आरोपीचे वकील उपस्थित होते.

Related posts: