|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लघुचित्रशैलीला मिळाला आधुनिकतेचा साज

लघुचित्रशैलीला मिळाला आधुनिकतेचा साज 

युनाते क्रिएशन्सचे विद्यार्थी जोपासताहेत चित्रकला

संघमित्रा चौगले/ कोल्हापूर

    भारतीय चित्रकलेमध्ये गुहा चित्र आणि भित्तीचित्रांचा समावेश होता. यानंतर मोघलांचा देशात प्रवेश झाला. त्यांच्याबरोबर कागद आला. या कागदाच्या उपलब्धिनंतर लघुचित्रांचा प्रकार देशात रूढ झाला. अशी ही टप्प्याटप्प्याने बदलत गेलेली शैली गेल्या 150 वर्षात लुप्त झाली होती. पण याला नव्याने सादर करण्याचे काम कोल्हापूरातील युवकांनी केले. शाहू रूपी लघुचित्र शैली पहिल्यांदाच चित्रात्मक स्वरूपात मांडण्याचे काम युनाते क्रिएशन्सच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या माध्यमातून मुलांनी या कलेची जपासना केली आहे. याचबरोबर भारतामध्ये लघुचित्र शैलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेखाटण्याचा प्रयत्नही पहिल्यांदाच केलेला आहे.

भारतीय चित्रकलेचा इतिहास

भारतीय चित्रकलेची सुरूवात गुहा चित्रातून झालेली आढळते. भव्य आकार असलेली अजिंढा वेरूळ भित्तीचित्रांची पूर्वमध्य युगातील जागा उत्तरमध्ये युगातील हस्तलिखित ग्रंथांनी घेतली. छोटय़ा चित्रांनी आणि नक्षींनी नटलेले हस्तलिखित ग्रंथ निर्माण होऊ लागले. सुरूवातीस ताडपत्रांवर कोरली जाणारी हि चित्रे 15 व्या शतकापासून कागदावर काढली जाऊ लागली. मुघलांच्या राजसत्तेमुळे लघुचित्रांमध्ये नवे पर्व सुरू झाले. पर्शियन, इराणी आणि भारतीय चित्रकारांच्या मिलाफातून मुघल शैलीला संजीवनी मिळाली. इराणी चित्रकार उत्तम रेखांकन तर निसर्गदृश्य, सुक्ष्म रंगछटा आणि अलंकरण असे बाह्यसौदर्य पर्शियन चित्रकार रेखाटत असत. यामध्ये व्यक्तिचित्रण, भावनाविष्कार भारतीय चित्रकार घडवत.

युनाते क्रिएशन्स

  आजचे युवक काहीतरी वेगळे करत असतात. अनेकवेळा ते दिसून येतेच असे नाही. तर काहीप्रसंगी ते आपल्या कलेची जाहिरात करण्यासाठी कमी पडतात. अशावेळी आम्ही आपली कला कशाप्रकारे इतरांसमोर सादर करू शकतो हा विचार केला. यावेळी सर्व मुलांनी एकत्र बसून चर्चा करून लघुचित्रे बनवण्याचे ठरविले. याचबरोबर चित्रकलेमध्ये काम करत असल्याने प्राचिन लघुचित्र शैली डोळ्यासमोर आल्याचे युनाते क्रिएशन्सचे कलाकार म्हणतात.

लघुचित्र बनवण्यातील आव्हाने

   युनाते क्रिएशन्सतर्फे रेखाटण्यात आलेल्या या चित्रांतील एक चित्र रेखाटण्यासाठी प्रत्येकी दिड ते दोन महिने लागले. जानेवारी 2017 पासून सातत्याने सर्व मुले या चित्रप्रदर्शनासाठी काम करीत होती. पुर्वी मानवाच्या डोक्यातील केसाइतके छोटे ब्रश असायचे. पण सध्या आधुनिक माध्यमातील ब्रश,  आणि नैसर्गिक रंगाबरोबर वॉटर आणि पोश्टर कलरचा विद्यार्थ्यांनी वापर केला आहे.

    छत्रपती शाहू महाराजांवरील ही पहिलीच चित्रे आहेत. याचबरोबर ही सर्व हस्तचित्रे आहेत. हे बनवताना शाहू महाराजांचे चित्र रेखाटायचे असेल तर मुलांसमोर प्रश्न होता की आपल्या चित्रातून ते शाहू महाराज वाटले पाहिजेत दिसले पाहिजेत. त्यांचा तो रूबाब, शाही थाट आणि त्यांची नजर भारदस्तपणा आदी भाव चेहऱयावर येणे आवश्यक होते. तसेच हे सर्व काम हाताने करत असल्याने आणि एकदाच करायचे असल्याने त्यात चुका होणारच नाहीत ही काळजी घ्यावी लागे. शाहू महाराजांची ठरावीकच चित्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे यासाठी इंटरनेट आणि पुस्तकांचा संदर्भ कलाकारांना घ्यावा लागला. राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कूळातील सर्वांची चित्रेही चित्रीत केली आहेत. यासाठी युनाते क्रिएशन्सच्या शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, पुष्पक पांढरबळे, अभिषेक संत, प्रतिज्ञा व्हनभट्टे, आकाश झेंडे, मनिषा पिसाळ यांनी काम केले आहे.

    सध्या या चित्रांचे प्रदर्शन काही दिवसांनी दिल्ली येथे भरविण्याचे अश्वासन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिले आहे. तसेच हि चित्रे विक्रीसाठी नसून इच्छुकांना हे पहायचे झाल्यास युनाते क्रिएशन्सचे कार्यालय अथवा दळवीज आर्ट कलामहाविद्यालयामध्ये जावे लागेल.

 

प्रतिक्रीया- प्रतिक्रियांचे फोटो- एआरकेओपीला नावाने सेव्ह आहेत

मोघलांच्या काळातली कला आज मुलांना सादर करणे हे एक आव्हान होते. ते त्यांनी खुप कष्टांनी आणि मोठय़ा उत्साहाने पार पाडले. गेल्या 10 महिन्यांपासून त्यांनी सातत्यांने आपले काम केले आहे. हाताने चित्रे काढताना त्यांनी शाहूं राजांना जसेच्या तसे लोकांसमोर या कलेल्या माध्यमातून सादर केले आहे.

Related posts: