|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोळशाला विरोध करणाऱयांनी अगोदर वीज वापरणे बंद करावे

कोळशाला विरोध करणाऱयांनी अगोदर वीज वापरणे बंद करावे 

प्रतिनिधी/ पणजी

 कॉग्रेसचे आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड यांनी भाजपने वास्को येथे कोळसा हब सुरु केला असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्याचे हफ्ते घेतो असा आरोप केला आहे त्यांच्या या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. भाजप सरकार हे प्रदुषणाविरोधी असून कोळासा वाहतूकीमुळे प्रदुषण होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आह,s असे यावेळी भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 गोव्यात होणाऱया कोळासा वाहतूकीला पूर्ण विरोध करता येत नाही. हा कोळसा हैदराबादमध्ये जातो त्यामुळे आम्हाला गोव्यात इथे वीज मिळते. जे लोक कोळासा वाहतूकीला विरोध करतात त्यांनी अगोदर आपल्या घरात वीज वापरणे बंद करावे असे खुले आव्हान यावेळी दत्तप्रसाद नाईक यांनी केले आहे. भाजप सरकारने या  कोळशापासून होणाऱया प्रदुषणावर उपाय योजना सुरु केली आहे. गेल्या ऑगस्ट माहिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केंदीय पर्यावरण मंत्रालयाला निवेदन दिले आहे. वास्को येथील एनएच 17 बी व आता पुल बांधण्याचे काम सुरु आहे येणाऱया आठ महिन्यात ते पूर्ण होणार आहे त्यामुळे शहरातून होणारी ही कोळसा वाहतूक नंतर शहराबाहेरुन होणार आहे. तसेच अन्य अनेक उपाययोजना भाजप सरकारने योजिल्या आह,s असे यावेळी नाईक म्हणाले. 

 भाजप सरकारच्या आगोदर या काँगेसने या कंपन्यांना वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली होती. तसेच गोव्यातील कॅसिनोंना कॉंगेसने परवानगी दिली होती. आता भाजपच्या नावाने ओरड सुरु केली जात आहे. गेले अनेक महिने गप्प असलेले आमदार रेजिनाल्ड यांनी अचानक या विषयी आवाज उठविला आहे. ते एवढे दिवस गप्प का होते. त्यांनी अगोदर काँगेसने गोव्यासाठी काय केले ते सांगावे. भाजप सरकार आले नसते तर राज्याचा विकास झाला नसता, असे यावेळी दत्तप्रसाद नाईक म्हणाले. 

फोटोः

Related posts: