|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » श्रीलंका दौऱयाआधी भुवीचे शुभमंगल

श्रीलंका दौऱयाआधी भुवीचे शुभमंगल 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार लवकरच नवी इनिंग सुरु करणार आहे. भुवनेश्वर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवी आपली प्रेयसी नुपूरशी मेरठ येथे विवाहबद्ध होईल. यासाठी भुवी व नुपूरच्या घरी जोरदार तयारीही सुरु झाली आहे. भुवीच्या विवाहानंतर दोन रिसेप्शन होणार असून यातील एक 26 नोव्हेंबररोजी बुलंदशहर येथे तर दुसरे रिसेप्नशन 30 नोव्हेंबररोजी दिल्ली येथे होईल. लंकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी भुवीची टीम इंडियात निवड झाली आहे. पण, दुसरी कसोटी 24 ते 28 नोव्हेंबरदरम्यान नागपूर येथे होणार असल्याने त्याला या सामन्याला मुकावे लागणार आहे. तसेच टीम इंडियातील कोणताही सदस्य या विवाहसोहळय़ाला उपस्थित असणार नाहीत. भुवनेश्वरचे वडील किरण पाल सिंग यांनी सांगितले की, शुभकार्य मेरठमध्ये व्हावे अशी कुंटुबियांची इच्छा होती. मेरठमध्ये कुटुंबिय, नातेवाईक येणार असून टीम इंडियातील सदस्यांसाठी दिल्लीत 30 रोजी रिसेप्शन ठेवले आहे. लंकेविरुद्ध मालिकेसाठी 30 रोजी टीम इंडियात दिल्लीत असणार असल्याने संपूर्ण संघ या समारंभासाठी उपस्थित राहिल.

Related posts: