|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » बुद्धिबळाच्याही नॅशनल लीग व्हाव्यात

बुद्धिबळाच्याही नॅशनल लीग व्हाव्यात 

पुणे / प्रतिनिधी

 भारतात क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस अशा खेळांना महत्त्व प्राप्त झाले असून, बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या धर्तीवर सर्व खेळाडूंच्या बुद्धिबळाच्याही राष्ट्रीय लीग स्पर्धा व्हाव्यात. यामध्ये सर्व खेळाडूंना सहभागी करून घ्यावे. त्यातून बुद्धिबळाचा खेळाचा प्रसारही होईल, अशी अपेक्षा गँडमास्टर विश्वनाथन आनंद याने शनिवारी येथे व्यक्त केली.

 गेरा डेव्हलपमेंटच्या ‘चाइल्ड सेंट्रिक’ घरांच्या एज्यु-इन्फोटेन्मेंट केंद्र, इव्हॉल्व्हचे आनंदच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी तो बोलत होता. या वेळी गेरा डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा उपस्थित होते.

 बॅडमिंटन लीग अलीकडेच पार पडली. त्या धर्तीवर बुद्धिबळाच्याही स्पर्धा असाव्यात का, असा प्रश्न विचारला असता, आनंद म्हणाला, बुद्धिबळाच्या राष्ट्रीय लीग व्हायल्या हव्यात. त्यात सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला पाहिजे. यातूनच आपल्याला नवोदित खेळाडूही मिळतील. नवोदितांना व्यासपीठही मिळेल. महाराष्ट्र चेस लीगच्या स्पर्धा होतातच. राष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात की नाही, याचा निर्णय भारतीय बुद्धिबळ असोसिएशनचा आहे.

 भारतात क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन यासारखे खेळ लोकप्रिय होत आहेत. त्याप्रमाणे बुद्धिबळाचा प्रसार व्हावा यासाठी खेळाडूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बुद्धिबळप्रेमींना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यातूनच चेस लीगची निर्मिती होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 निवृत्तीनंतर अकादमीबाबत विचार करेन

 आत्ताच्या क्षणाला तरी अकादमीचा काढण्याचा विचार नाही. निवृत्तीनंतर अकादमी काढायची की नाही, याबाबत मी विचार करेन. सध्या मी खेळाचा आनंद घेत आहे. यापुढेही खेळत राहीन. इतक्यात माझ्या मनात निवृत्तीचा विचार नाही, अशा शब्दांत आनंदने आपल्या निवृत्तीचे वृत्त फेटाळले.

Related posts: