|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिला आघाडीतर्फे महामेळाव्याला पाठिंबा

महिला आघाडीतर्फे महामेळाव्याला पाठिंबा 

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीची बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीत महामेळाव्याला पाठिंबा दर्शवत मोठय़ा संख्येने महामेळाव्यात सहभागी  होण्याचे आवाहन अध्यक्षा माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांनी केले. बेळगाव व सीमाभागावर कर्नाटक सरकार आपला हक्क सांगण्यासाठी म्हणून गेल्या काही वर्षांपासून हिवाळी अधिवेशन काही दिवस बैळगावमध्ये घेत आहे. आणि सीमाभाग कर्नाटक राज्यात असल्याचे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

सीमाभागातील मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी 61 वर्षे आपण झगडत आहोत. हा लढा यशस्वी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. यासाठी महामेळावा भरविण्यात येणार आहे. यामुळे सर्वांनी महामेळाव्याला हजर राहून सरकारला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीला प्रिया कुडची, अर्चना कावळे, कांचन भातकांडे, अर्चना देसाई, अनुपमा कोकणे, आशा सुपली, भाग्यश्री जाधव, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोलेकर, रेखा गोजगेकर उपस्थित होत्या.