|Monday, December 17, 2018
You are here: Home » क्रिडा » प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार

प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार 

वृत्तसंस्था /दुबई :

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर होणाऱया टीकेवर प्रथमच विधान केले असून नेहमीप्रमाणेच त्याने थंड डोक्मयाने उत्तर दिले आहे. अलीकडच्या काही टी-20 सामन्यात त्याच्याकडून अपेक्षित प्रदर्शन घडले नाही. त्यावरून त्याने आता निवृत्तीबाबत विचार करण्याची गरज असल्याचे काही माजी खेळाडूंनी म्हटले होते. ‘प्रत्येकला आपले मत असते आणि ते व्यक्त करण्याचा त्याला अधिकारही आहे,’ असे उत्तर धोनीने या संदर्भात विचारल असता दिले आहे.

अजित आगरकरसह काही माजी खेळाडूंनी धोनीच्या टी-20 मधील भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करून भारतीय क्रिकेट वर्तुळात थोडीशी खळबळ निर्माण केली. विशेष म्हणजे त्याच्यावर शंका उपस्थित करणाऱयांत त्याचा माजी सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मणचाही सहभाग आहे. पण या खेळाडूंच्या टीकेने धोनी मात्र अजिबात विचलित झालेला नाही. ‘प्रत्येक व्यक्तीला आपापली मते असतात आणि ती त्यांना व्यक्त करण्याचा अधिकारही आहे. आपण त्यांच्या मताचा आदर करायला हवा,’ असे त्याने आगरकरच्या वक्तव्याबाबत विचारले असता सांगितले.

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली युवा संघाला घेऊन 2007 मधील पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यानंतर 2011 मध्ये वनडे विश्वचषकही जिंकला. पण अलीकडे त्याला फलंदाजीत संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या राजकोटमध्ये झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, त्यात हे प्रकर्षाने जाणवले होते. या सामन्यात त्याने 49 धावा जमविल्या. त्यापैकी नंतरच्या 26 धावा त्याने केवळ 5 चेंडूत फटकावल्या होत्या. पण त्याधीच्या 23 धावांसाठी त्याला 32 चेंडू खेळावे लागले होते. त्यामुळेच त्याच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे हेच आपल्यासाठी प्रेरणास्रोत असल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘संघाचा सदस्य असणे हीच आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहे. दैवी देणगी लाभलेली नसतानाही मोठी मजल मारणारे अनेक खेळाडू तुम्ही पाहिले असतील. त्यांनी ते साध्य केले ते केवळ या खेळाच्या वेडामुळे, ध्यासामुळे. प्रशिक्षकांना अशा खेळाडूंचा शोध घ्यावा लागतो. मात्र प्रत्येक खेळाडूला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतेच असे नाही,’ असे धोनी म्हणाला.

संयुक्त अरब अमिरातमधील आपल्या पहिल्या वैश्विक क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनासाठी तो येथे आला होता. एमएस धोनी क्रिकेट अकादमी ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय अकादमी असून दुबईस्थित पॅसिफिक व्हेन्चर्सच्या सहकार्याने त्याची सुरुवात करण्यात आली आहे. ‘निकालापेक्षा प्रक्रियेवर माझा जास्त विश्वास आहे. मी परिणामाचा केव्हाही विचार करीत नाही. त्यावेळी जे करणे जास्त गरजेचे आहे, तेच मी करीत असतो. या प्रक्रियेत मी इतका गढून गेलेलो असतो की निकाल आपल्या मनाविरुद्ध लागला तर काय होईल, या विचाराचे मी अजिबात ओझे घेत नाही,’ असे तो म्हणाला.

Related posts: