|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आरोपींना फाशीसाठी सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडणार : गृहराज्यमंत्री केसरकर यांची ग्वाही

आरोपींना फाशीसाठी सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडणार : गृहराज्यमंत्री केसरकर यांची ग्वाही 

प्रतिनिधी /सांगली :

अनिकेत कोथळे या युवकाचा पोलीस कोठडीत खून करणाऱया आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडेल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीत बोलताना दिली. त्याचबरोबर स्थानिक अधिकाऱयांच्या त्रुटी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र अधिकाऱयामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मृत अनिकेतच्या कुटूंबियांनी सर्व संशयितांना अटक न झाल्यास सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर डीवायएसपी काळेंना सहआरोपी करणे आणि पोलीस अधिक्षकांची बदली यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने आज सोमवारी सांगली बंदचा निर्णय घेतला आहे.

 दरम्यान मंत्री केसरकर यांनी रविवारी सायंकाळी आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱयांची झाडाझडती घेत या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा बेदम मारहाण करून खून केल्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचेही केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. फडणवीस यांनी अनिकेतच्या खुनामुळे उघडय़ावर पडलेल्या कुटूंबियांना अर्थसहाय्य करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसात कोणत्या नियमात बसवून मदत देता येईल याबाबत निर्णय होईल. पण कर्ता युवक गेल्याने केवळ आर्थिक मदत देऊन कोथळे कुटूंबियांचे सांत्वन होणार नाही. तर त्याच्या खुनातील सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडेल.

Related posts: