|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » इराक – इरान सीमेला भूकंपाचा धक्का ; 164 जणांचा मृत्यू

इराक – इरान सीमेला भूकंपाचा धक्का ; 164 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / तेहरान  :

इरान-इराक सीमा भागात तीव्र भूकंपाचा धाक्का बसला असून या 164 जणांचा मृत्यू झाला आहे तर 300हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

‘द इंडिपेंडेंटने’ दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता7.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. इरानमधील जवळपास 14 राज्यांत भूकंपाचे झटके जाणवले.भूकंपाचा केंद्रबिंदू इरानमधील हलाबजा शहरातील दक्षिण-पश्चिम भागात होता.आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजून 18 मिनिटांनी हा भूकंप झाला. इराणमध्ये यापूर्वी 2003मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता.यामध्ये सुमारे 26 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.