|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गौरव सोहळय़ाला लोटला जनसागर

गौरव सोहळय़ाला लोटला जनसागर 

जिल्हा परिषदेचे मैदान हाऊसफुल्ल, रस्त्यावरही स्क्रीनवर शरदप्रेमींच्या उड्डय़ा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळचे सुपूत्र खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिह्यातील जनतेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळय़ाला जनसागर लोटला होता. जिल्हा परिषदेचे मैदान त्यांचा सत्कार याची देही याची डोळा पाहण्यासाठी जिह्याच्या कानाकोपऱयातून लोटला होता. एवढेच नव्हे तर रस्त्यावर लावलेल्या स्क्रीनवरही रयतेच्या राजाचा सत्कार पाहण्यासाठी अक्षरशः उडय़ा पडल्या होत्या. सत्कार सोहळय़ासाठी आलेल्या साताकरांच्या वाहने सुस्थितीत सैनिक स्कूल, जिल्हा तालिम संघ, कृष्णानगर पाटबंधारे खात्याचे मैदान यासह शाहु क्रीडा संकुल, पोलीस कवायत मैदानावर केले होते. त्यांच्या सत्कार सोहळय़ावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने अवघे आकाश आतषबाजीने फुलून गेले होते.

खासदार शरद पवार यांचे आणि सातारा जिह्याचे नाते अगदी जवळचे. जिह्याच्या मातीतले असल्याने जिह्याच्यावतीने आयोजित सत्कार सोहळय़ाचे जिल्हयाच्या नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले होते. हे नियोजन एवढे सुक्ष्म होते की मैदानात किती लोकसंख्येचे आहे. तेवढय़ापासून ते मैदानाबाहेर रस्त्यावर किती जनसमुदाय बसू शकतो. त्यानुसार सकाळपासूनच आपल्या राजाच्या सत्कारसोहळय़ाला जिह्याच्या कानाकोपऱयातून लोक येत होते. दुपारी 4 वाजताच जिल्हा परिषदेचे मैदान हाऊसफुल्ल झाले. खासदार शरद पवार हे दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान साताऱयात पोहचले. शासकीय विश्रामगृहात गोपनिय चर्चा झाल्या. सव्वा पाचच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांचे आगमन जिल्हा परिषदेच्या मैदानावरील व्यासपीठावर झाले. त्यांच्यासोबत ज्यांच्या हस्ते सत्कार होणार ते माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री महादेव जानकर, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवर मंडळी होती.

सत्कारसोहळय़ाला येणारे हे सर्व पक्षीय होते. त्यामुळे त्यांच्या बसण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानात खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. मैदान हाऊसफुल्ल झाले होते. एवढेच नाही तर व्यासपीठाच्या जवळ असलेल्या व्हीआयपीच्या आरक्षीत जागेत अनेक कार्यकर्ते भारतीय बैठक मारत सत्कार सोहळय़ाचा आनंद घेतला जात होता. पोलिसांच्याकडून पासेस असेल तर ते आतमध्ये सोडले जात होते. त्यांचा होणारा सत्कार सोहळय़ाला क्षणचित्रे स्क्रीनवर दाखवली जात होती. या स्क्रीनवरही सातारवासियांच्या उड्डय़ा पडल्या होत्या. जिह्यातील 11 तालुक्यातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते, निष्ठावान यांनी या सोहळय़ाला हजेरी लावली होती.

पार्किंगने मैदाने हाऊस फुल्ल

खासदार शरद पवार यांच्या सत्कारसोहळय़ासाठी जिह्यात प्रत्येक आमदारांना जबाबदारी दिली गेली होती. त्यानुसार जिह्यातून साताऱयाकडे जनसागर लोटला होता. साताऱयाकडे आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने साताऱयातील मैदानावर लावण्यात आली होती. त्या वाहनांची देखरेख करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे सर्व मैदान हाऊसफुल्ल झाली होती.

आतषबाजीने अवघे गगन झाले…

खासदार शरद पवार यांच्या सत्कारसोहळय़ासाठी संयोजन समितीच्यावतीने फुल्ल तयारी केली होती. खासदार शरद पवार यांचा सत्कार होताना तो क्षण. आतषबाजी करण्यात आली. करण्यात आलेल्या आतषबाजीन अवघे गगन रंगेबीरंगी झाले होते. त्याकडे उपस्थित सर्व जनसमुदाय काहीकाळ तर काही काळ शरद पवार यांच्या होणाऱया सत्काराकडे नजरा खिळल्या होत्या.

 

 

Related posts: