|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म्हादईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी

म्हादईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी 

प्रतिनिधी / बेळगाव

म्हादई जलतंटय़ावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी केली आहे. हिवाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी सांबरा विमानतळावर मुख्यमंत्री दाखल झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी यासाठी आपण मागणी केली आहे. गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आपण तीनवेळा पत्रे लिहिली आहेत. मात्र या पत्रांना त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. चर्चेला जर त्यांनी बोलाविले नाही तर आपण कसे जाणार? त्यांच्या दरवाजात जावून मी आत येऊ का? असे विचारू का? असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल पुरावे जाहीर करण्याचे सांगितले आहे. याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता प्रथम ते स्वतः अनेक गुह्यांतून बाहेर पडू देत. भाजप नेत्यांवर अनेक आरोप आहेत, अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी त्याचा विचार करावा. केंद्र सरकारमधील 24 मंत्र्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाले आहेत. जॉर्ज यांचा राजीनामा मागणाऱयांनी आदी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts: