|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनीदिली आहे.याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. सोमवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’बंगल्यावर पार पडली. या बैठकीत विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र नागपूरात होणाऱया हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे,नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Related posts: