|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » राष्ट्रीय ईलेक्ट्रॉनिक धोरण लवकरच

राष्ट्रीय ईलेक्ट्रॉनिक धोरण लवकरच 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारकडून लवकरच नवीन राष्ट्रीय ईलेक्ट्रॉनिक्स धोरण लागू करण्यात येईल. या माध्यमातून मोबाईल हँडसेट, ग्राहकोपयोगी विद्युत उत्पादने, एलईडी उत्पादने, ईलेक्ट्रिक वाहने यांच्या उत्पादनासह व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येईल. नवीन वर्षापासून ईलेक्ट्रॉनिक धोरण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, सरकारकडून सुधारित धोरण राबविण्यात येईल. यासाठी क्षेत्रातील तज्ञांबरोबर अन्य लोकांना सहभागी करत 9 गटांची स्थापना करण्यात येईल आणि हे गट 30 नोव्हेंबरपर्यंत सरकारला सूचना देतील. या सूचनांनुसार सुधारित धोरण राबविण्यात येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनांनुसार देशातील वस्तूंचा दर्जा तयार करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे देशात स्टार्टअपला चालना मिळेल. संशोधन आणि विकास क्षेत्राला मदत होईल. सध्या देशात आवश्यकतेनुसार 65 टक्के ईलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आयात करण्यात येते. 2020 पर्यंत 400 अब्ज डॉलर्सपर्यंत आयात पोहोचेल. देशातच उत्पादन घेत आयात 100 अब्ज डॉलर्सपर्यंत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

साधारण 100 मोबाईल उत्पादक कंपन्यांनी भारतात प्रकल्प सुरू केला असून त्याचप्रमाणे अन्य ईलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती देशातच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ईलेक्ट्रॉनिक्स प्रकारात जागतिक उत्पादन बाजारपेठ बनविण्याचा विचार आहे.

Related posts: