|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाबुजमाल दर्ग्यानजिक ब्लेडने हल्ला, तरूण जखमी

बाबुजमाल दर्ग्यानजिक ब्लेडने हल्ला, तरूण जखमी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गुरूवार पेठेतील बाबुजमाल दर्गा परिसरात मंगळवारी दुपारी किरकोळ वादातून जहाँगिर मिलन शेख (वय 21, रा. गुरूवार पेठ) याच्यावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. शैख याच्या मानेवर ब्लेडने केलेल्या वारमुळे तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नाऱया या तरूणावर गुन्हा नोंद झाला आहे.

जहाँगिर शेख हा गुरूवार पेठेतील सँडविचच्या एका गाडय़ावर काम करतो. संशयित नाऱया आणि शेख यांच्यात सोमवारी भांडण झाले होते. संशयिताने यापुर्वीही काही जणांना मारहाण, दमदाटी केल्याची माहिती शेख याने दिली आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सँडविचच्या गाडीवर जहाँगिर शेख हा पाणी भरत होता. यावेळीही नाऱया याने तेथे येऊन त्याला शिवीगाळ केली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास शेख हा बाबुजमाल दर्गा परिसरात थांबला असता तेथे नाऱया आला, त्याने थांबलेल्या जहाँगिर शेख याला अडवून त्याच्या मानेवर ब्लेडने वार केले. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

Related posts: