|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हाळोली फाटय़ानजीक अपघातात इस्लामपूर येथील सातजण जखमी

हाळोली फाटय़ानजीक अपघातात इस्लामपूर येथील सातजण जखमी 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाटय़ानजीक बोलेरो गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात (उरण, ता. इस्लामपूर, जि. सांगली) येथील सातजण जखमी झाले. यातील चंद्रकांत पाटील (वय 50), अशोक जाधव (वय 49) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी, चंद्रकांत पाटील, अशोक जाधव यांच्यासह चंद्रकांत जाधव (वय 52), बळवंत जाधव (वय 60), सर्जेराव बुरसे (वय 66), सर्जेराव खोत (वय 66), कल्लाप्पा पोचे (वय 60) सर्वजण रा. उरण, ता. इस्लामपूर जि. सांगली. हे पर्यटनासाठी तळकोकणात गेले होते. पर्यटन झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी जात होते. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाटय़ानजीक समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातामध्ये गाडीतील सातही जण जखमी झाले. जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आजरा येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडहिंग्लज येथे उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आले. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

Related posts: