|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म्हणे …सीमाप्रश्न संपला

म्हणे …सीमाप्रश्न संपला 

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे तुणतुणे

प्रतिनिधी/ बेळगाव

सीमाप्रश्न यापूर्वीच संपुष्टात आला आहे. मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान असतानाच या वादाला पूर्णविराम मिळाला होता. त्यामुळे आता हा प्रश्न पुन्हा उकरून काढण्यात अर्थ नाही, असे तुणतुणे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी वाजविले. आपल्या पक्षातर्फे आयोजित मेळाव्यात हे वक्तव्य त्यांनी केले. सीमाप्रश्ना बाबतीत सर्वच राष्ट्रीय पक्षांची भूमिका एकसारखीच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 ?निजद मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी सिपीएड मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सीमावादावर भाष्य करून मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाद  संपला असताना देखील येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी हा वाद सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. हे चुकीचे असल्याचे वक्तव्य केले.

   यावेळी बोलताना म्हणाले, प्रादेशिक पक्षाची ताकद मोठी असते. निजद पक्ष प्रादेशिक असल्याने सर्वांनी या पक्षाच्या पाठीशी रहावे, असे सांगितले. कावेरी पाणी वाद सोडविला त्याच धर्तीवर म्हादई पाणीप्रश्न सोडवू, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. पण हा वाद निकालात काढण्यास पंतप्रधान इछुक नसल्याचे दिसून आले आहे. देशाचा विकास करण्यासाठी भाजपचा जन्म झाला असल्याचा आव आणत आहेत, पण त्याव्यतिरिक्त दुसरे कोणी नाही का? असा प्रश्न उपस्थित करून आगामी निवडणुकीत पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

   ?सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप निजद पक्षाचे राज्याध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या भाषणात केला. शेतकऱयांची कर्जमाफी करण्यास तयार नाही. शेतकऱयांचे हित जपणारे सरकार नाही. विविध योजनांची खैरात करून काँग्रेस सरकारने खजिना रिकामा केला आहे. 3 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या असून मृत शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यास सिद्धरामय्या सरकार उदासीन असल्याची टीका कुमारस्वामी यांनी केली.

?पोलीस खात्यामध्ये प्रामाणिक अधिकाऱयांना किंमत राहिली नाही. रायबाग तालुक्मयातील कल्लाप्पा हंडीबाग या अधिकाऱयाने आत्महत्या करण्यास काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. मटका, जुगार अशी बेकायदेशीर कामे करण्यास मुभा देण्यासाठी हंडीबाग या अधिकाऱयावर दबाव घालण्यात आल्याने त्याने घरी येऊन आत्महत्या केली असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच उत्तर कर्नाटकमधील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सुवर्णसौध निर्माण केली आहे. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आठवडय़ातून दोन दिवस कामकाज करण्याची गरज आहे. निजदचे सरकार आल्यास आठवडय़ातून दोन दिवस बेळगावमधून कामकाज करणार असल्याचे सांगून आगामी काळात होणाऱया निवडणुकीत निजदला बहुमत द्यावे, असे आवाहन कुमारस्वामी यांनी केले. यावेळी पी. जी. आर. सिंधीया, माजी मंत्री बाबागौडा पाटील, बसवराज होरट्टी, ए. एस. पाटील-नलसोडे आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..

Related posts: