|Saturday, January 20, 2018
You are here: Home » Top News » अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी खुद्द शरद पवार धावले

अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी खुद्द शरद पवार धावले 

ऑनलाइन टीम / गडचिरोली  :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचे पाहायला मिळाले. गडचिरोली दौऱयाच्या वेळी पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली.

शरद पवार गडचिरोलीच्या दौऱयावर आहेत. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचे दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वतः गाडीतून उतरुन जखमींना मदत केली. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर काढायला मदत केली.

 

 

 

Related posts: