|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Automobiles » मेड ईन इंडिया जॅग्वार एफ-पेस कार लाँच

मेड ईन इंडिया जॅग्वार एफ-पेस कार लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जॅग्वार लॅण्ड रोव्हरने भारतात तयार केलेली एफ-पेस ही एसयूव्ही कार लाँच करण्यात आली आहे. या कारची किंतम तब्बल 60.02 लाखरूपये आहे. याची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सुरू होणार आहे.

ही कार पुण्याच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही जॅग्वारची सहावी कार आहे. भारतात ही कार तयार झाल्याने या टॉम मॉडेल कारची किंमत बेसिक मॉडेलपेक्षाही कमी आहे. बेस व्हेरिएंट प्यारेची किंमत 68.40 लाखा आहे. पहिले प्रस्टिज व्हेरिएंटची किंमत 73.25 लाख होती. आता या कारची किंमत तब्बल13 लाखांनी स्वस्त झाली आहे. या कारमध्ये अडॅप्टिव हेडलाईट,ऑक्टिव्हिटी की,वाय-फाय हॉटस्पॉट आणि प्रोसर्विसेस देण्यात आले आहे.यामध्ये10.2इंच टचस्क्रिन आणि 11 स्पीकर्स 380 वॉटचे मेरिडियन साउंड सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 2.0लीटरचे 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिजेल इंजिन आहे. जे 179पीएस पॉवर आणि 430 एनएम टॉर्क देत आहे.

Related posts: