|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अंगाला कवसकुली लावून चोरटय़ांनी रोकड लांबवली

अंगाला कवसकुली लावून चोरटय़ांनी रोकड लांबवली 

स्टेट बँक कृषी शाखेच्या परिसरातील घटना;

प्रतिनिधी/ सातारा

भारत गॅस एजन्सीमध्ये कलेक्शन गोळा झालेली रक्कम भरण्यासाठी गणेश तानाजी सोनावणे (वय 27, रा. विरमाडे, ता. जावली) हे सकाळी स्टेट बँकेत निघाले होते. बँकेजवळ पोहचलेही, परंतु त्यांच्या अंगावर चोरटय़ांनी कवसकुली टाकून त्यांच्याजवळील तब्बल 3 लाख 82 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. दिवसभर त्या बँकेच्या परिसरात पोलीस चौकशी करत होते. रात्री उशीरा सातारा शहर पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे बँकेच्या परिसरात दबक्या आवाजात जोराची चर्चा रंगत होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरात भारत गॅस एजन्सीची शाखा आहे. त्यामध्ये गणेश तानाजी सोनावणे हे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे बुधवारी एजन्सीमध्ये जी रक्कम जमा झाली होती. ती हिशोब करुन एजन्सीच्या खात्यावर जमा करण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. सुमारे 3 लाख 82 हजार रुपयांची रोखड एका पिशवीत घेऊन ते सातारा बसस्थानकाच्या पाठीमागे पारंगे चौकातील स्टेट बँकेच्या कृषी शाखेत आले. बँकेच्या जवळ पोहचल्यानंतर बँकेत गर्दी होती. बॅकेच्या परिसरात सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अनोळखी तीन ते चार जणांनी बोलण्याच्या नादात कवसकुली अंगावर टाकली. त्यामुळे गणेश सोनावणे यांच्या अंगाला खाज आल्याने ती खाजवण्यासाठी त्यांनी हातातील पैशाची पिशवी बाजूला ठेवली. हेच चोरटय़ांनी पाहून व गणेशचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येताच पैशाची पिशवी घेवून तेथून पोबारा केला. गणेशला जेव्हा पिशवी नसल्याचे समजले तेव्हा तो भांबावून गेला. बँकेत इकडेतिकडे पिशवीची शोधशोधही केला. अनेकांच्या ही बाब निदर्शनास आली. तेव्हा अनेकांनी त्याला विचारणाही केली. त्याने पैसे गेल्याची माहिती एजन्सीमध्ये दिली. रात्री उशीरा सातारा शहर पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. पोलिसही त्या दृष्टीने खातरजमा करत होते. मात्र, या घटनेने बँकेमध्ये या चोरीमुळे कर्मचारी आणि आलेल्या ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण झाल्याची चर्चा रंगत होती.

Related posts: