|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवसेनेचा नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध

शिवसेनेचा नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध 

प्रतिनिधी/ पणजी

नद्याच्या राष्ट्रीयकरणाचे जे धोरण सध्या भाजप सरकारतर्फे लादले जात आहे. हे चूकिचे असून त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. असे शिवसेनेचे उपाध्यक्ष व प्रवक्ते जितेश कामत यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत कामत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी किशोर राव, परीमल पंडीत, निलेश वायंगणकर व संकेत चणेकर उपस्थित होते.

आतापर्यंत गोव्याचा इतिहास उलघडून पाहाल तर दिसून येते की गोव्यातील नैसर्गिक जलमार्गामुळे भारतामध्येच नाही तर परदेशातील लोकांमध्ये गोवा लोकप्रिय होते. उद्योगासाठी जलमार्ग चांगला मानला जात होता. यामुळे पोर्तुगिजांनी याच मार्गाचा वापर करत आमच्यावर राज्य केले. याच इतिहासाची पुरानवृत्ती न व्हावी आणि परत गोवा परकीयांच्या हातात न जावे यासाठी आम्ही निषेध करत आहोत या राष्ट्रीय करणात मोठय़ा उद्योजकांचा मोठा हात असून ते आपल्या फायद्यासाठी काहीही करु शकतात असे कामत यांनी पूढे सांगितले.

तसेच हल्लीच मुख्यमंत्र्यांनी वकत्व केले की जे लोक कोळश्याला विरोध करीत आहेत त्यांनी वीज वापरु नये. मला मुख्यमंत्र्यांना सांगांयचे आहे की कोळश्यापेक्षा माणसांचा जीव महत्वाचा असतो. त्यामुळे असे वक्तव्य करताना मुख्यमंत्र्यानी विचार करुन बोलावे. असेही कामत यांनी अधिक बोलताना सांगितले.

आता आम्ही राज्यातील जेवढय़ा या नद्यांच्या राष्ट्रीयकरणाऱया विरोध करणाऱया संघटना आहेत. त्यांना एकत्र करुन सर्व स्तरावरुन आम्ही विरोध दर्शविणार आहे. असे कामत यांनी पूढे सांगितले.

Related posts: