|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंचिम’ उद्घाटनास सोहळय़ास शाहरूख खान मुख्य अतिथी

आंचिम’ उद्घाटनास सोहळय़ास शाहरूख खान मुख्य अतिथी 

माहितीमंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते उद्घाटन

प्रतिनिधी / पणजी

येत्या सोमवारपासून सुरु होणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनास  मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे कुटुंबियही सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्य अभिनेता – अभिनेत्री कोण, याबद्दल काल दिवसभरात निश्चिती झाली नव्हती. मात्र सायंकाळी उशिरा शाहरूख खान यांच्या उपस्थितीविषयी माहिती देण्यात आली.

चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्घाटन कार्यक्रम सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असून त्यावेळी केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी उद्घाटन करणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यासाठी शाहरुख खान, अभिताभ बच्चन, शाहीद कपूर अशा अनेक दिगज्जांची नावे आली आहेत. त्यातील पहिल्या दोघांची नावे निश्चित झालेली आहेत. गोव्यात आतापर्यंत झालेल्या एकूण 13 महोत्सवातील दोन महोत्सवांच्या उद्घाटनास शाहरूख खान यांनी उपस्थिती लावली होती. आता ते तिसऱयांदा उपस्थित राहणार आहेत.

अमिताभ बच्चन यांना ’पर्सनलिटी ऑफ द इयर’ पुरस्कार

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ’पर्सनलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार यंदाच्या महोत्सवात देण्यात येणार असून तो सोहळा समारोपाच्या कार्यक्रमात आयोजित केला आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण करुनही अद्याप ते अभिनय क्षेत्रात आहेत, याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. समारोपाचा चित्रपट म्हणून ’थिंकिंग ऑफ हिम’ हा चित्रपट दाखविण्याचे ठरविण्यात आले आहे. तो कवी रविंद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित आहे.

Related posts: