|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या मातृश्रींचे निधन

रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या मातृश्रींचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

केंद्रीय समाजिक न्यायमंत्री व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या.

वांद्रे येथील गुरू नानक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हौसाबई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता वांद्रे येथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

 

Related posts: