|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Automobiles » महिंद्रातर्फे सर्वाधिक ताकदवान स्कॉर्पिओ बाजारात

महिंद्रातर्फे सर्वाधिक ताकदवान स्कॉर्पिओ बाजारात 

पुणे / प्रतिनिधी :

सुधारित एमहॉक इंजिन, 320 एनएमचा टॉर्क, जास्त स्टायलिश, उच्च तंत्रज्ञानयुक्त, जास्त आलिशान, अत्याधुनिक ब्रेकिंग यंत्रणा तसेच आकर्षक रंगांमधील नवीन स्कॉर्पिओचे गुरुवारी पुण्यात अनावरण करण्यात आले. 9.69 लाख रुपयांपासून ही स्कॉपिओ बाजारात उपलब्ध आहे.

नवी स्कॉर्पिओ एसथ्री (75 बीएचपी एम2डीआयसीआर इंजिन), एस5, एस7 (120 बीएचपी, 280 एनएम एमहॉक इंजिन) आणि एस 7 आणि एस 11 (140 बीएचपी, 320 एनएम एमहॉक इंजिन आणि पर्यायी 4 डब्ल्यू एस 11 वर) या प्रकारात उपलब्ध असेल. यामुळे नवीन स्कॉर्पिओ आधीपेक्षा जास्त ताकदवान ठरते. सहा स्पीड ट्रान्समिशन, नवीन क्रोम ग्रिल, फॉग लॅम्प्स, क्रोम बेझेल्स, मस्क्मयुलर अलॉय व्हील्स, ओआरव्हीएम, साइड टर्न इंडिकेटर्सचा यात समावेश आहे. सुधारित तंत्रज्ञानासह नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, वन टच लेन चेंज इंडिकेअर आणि नवा ऑटो विंडो रोल अप आहे. याशिवाय नवा पर्ल व्हाइट (फक्त एस 11 मध्ये) डायमंड व्हाइट (एस 11 खेरीज), नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्वहर, मोल्टेन रे. गाडी 7, 8, 9 आसनक्षमता प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

 

Related posts: