|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर

पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर 

नवी दिल्ली :

पाकव्याप्त काश्मीरबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर भारत परत मिळविणारच असे अहिर यांनी म्हटले. पीओके कोणाच्या बापाचा हिस्सा नसल्याचे फारुख यांनी बुधवारी वक्तव्य केले होते.

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मागील सरकारच्या चुकांमुळे पाकिस्तानच्या अधीन राहिला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पीओके परत मिळविण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यावर भारताचाच अधिकार असल्याचे अहिर म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे अब्दुल्लांनी मागील आठवडय़ात देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असून तो पाककडून कोणीच हिसकावू शकत नाही असे अब्दुल्ला म्हणाले होते.

 

Related posts: