|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मतदारांनी धनशक्तीस बळी पडू नये

मतदारांनी धनशक्तीस बळी पडू नये 

नवारस्ता :

पाटण मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून प्रचंड विकासाची कामे चालू आहेत. एका बाजूला आम्ही करीत असलेली विकासाची कामे आणि दुसऱया बाजूला विरोधकांचा धनशक्तीचा वापर याचा परिणाम दुर्देवाने नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माझ्या उमेदवारांना भोगावा लागला. विकासकामे करुनही प्रबळ आर्थिक ताकदीवर विरोधी उमेदवार निवडून आले. केवळ धनशक्तीच्या बळावर विरोधी उमेदवार निवडून आले. आता मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सावध रहावे. क्षणिक धनशक्तीस बळी न पडता विकासकामे पहावीत, असे भावनिक आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले. ते आपल्या 51 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बोलत होते.

आमदार देसाई म्हणाले, माझा 51 वा वाढदिवस साजरा होत असताना माझ्या वयाची 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामधील 32 वर्षे माझी सामाजिक कार्यात खर्ची घातली आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत मी जो मतदारसंघातील जनतेसमोर वचननामा सादर केला होता. त्यापैकी गेल्या तीन वर्षात 70 टक्के विकासकामे पूर्ण करण्यात मला यश मिळाले. मार्च 2017 पर्यंत 310 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करुन घेण्यात आपल्याला यश मिळाले. तर आगामी दोन वर्षात जी मोठी कामे प्रयत्न करुनही पूर्ण झाली नाहीत, ती प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीच माझा प्रयत्न राहणार आहे. आणि ती कामे मी पूर्णच करणार आहे.

Related posts: