|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अट्टल चोरांची टोळी गजाआड

अट्टल चोरांची टोळी गजाआड 

प्रतिनिधी /कराड :

कराड-पाटण रोडवरील सतनाम एजन्सीचे गोडावून फोडत चोरटय़ांनी 32 लाख 30 हजार 738 रूपयांचा मुद्देमाल पळवला होता. जुलै महिन्यात झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा करण्यात कराड पोलिसांना यश आले असून चोरीप्रकरणी सहा सराईत चोरटय़ांना पकडले. सतनाम एजन्सीवर पाळत ठेवून डल्ला मारल्याची कबुली संशयितांच्या टोळीने पोलिसांसमोर दिली आहे.

तेजस चंपालाल उनेजा (वय 33 रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वसाहत कोथरूड पुणे), सुरेश हरिराम चौधरी (वय 28 रा. जयमालानगर, जुनी सांगवी, पुणे), मुकेश मोहन चौधरी (वय 35 रा. गल्ली नंबर 7, खर्डी बायपास, वाघोली, पुणे), सुरेंद्र अस्लाराम चौधरी (वय 22 रा. घर नंबर 3 गल्ली नंबर 7 वाघोली, पुणे), चंपालाल ओघाराम वर्मा (वय 27 रा. मंडवारोड, दुर्गामाता मंदिराजवळ, पुणे), रतनलाल नागाराम डांगे (वय 27 रा. उबाळेनगर, वाघोली पुणे) अशी पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

कराड येथील अनिल बसंतानी यांच्या मालकीचे सतनाम एजन्सीचे कार्यालय व गोडावून कराड-पाटण रोडवर वारूंजी फाटय़ालगत आहे. 13 जुलै 2017 रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन काम झाल्यावर कर्मचाऱयांनी दिवसभरातील हिशेब उरकला. मालाच्या डिलीव्हरीसाठी आलेल्या गाडय़ांचा हिशेब झाल्यावर रात्री 9 वाजता कर्मचारी निखील बलराम पोपटानी व धरमसिंग रामसिंग बरीट यांनी गोडावून बंद केले. गोडावून बंद केल्याची माहिती फोनवरून मालक अनिल बसंतानी यांना देत कर्मचारी घरी गेले. 14 जुलै रोजी सकाळी सात वाजता गोडावूनच्या इमारतीत राहणाऱया आसवले यांचा अनिल बसंतानी यांना फोन आला. तुमच्या गोडावूनचे शटर उघडे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. खात्री करण्यासाठी अनिल बसंतानी यांच्यासह त्यांचे कर्मचारी गोडावूनकडे गेले. गोडावूनचे शटर उचकटल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यावर सीसीटीव्ही यंत्रणेचा डिव्हीआर चोरीस गेल्याचे समोर आले. गोडावूनच्या ड्राव्हरमधील 3 लाख 13 हजारांची रोकडही गायब होती. एका प्लास्टिकच्या पिशवीतील 63 हजारांची चिल्लर चोरटय़ांनी पळवली होती. 23 लाख 65 हजार 248 रूपयांची आयटी कंपनीची सिगारेटची 18 हजार 624 पाकीटांची बॉक्स, 4 लाख 40 हजारांची गायछाप जर्दाची बॉक्स असा एकूण 32 लाख 30 हजार 738 रूपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी पळवल्याचे उघड झाले.