|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » उरळी कांचनमध्ये लाकडी गोदामाला भीषण आग

उरळी कांचनमध्ये लाकडी गोदामाला भीषण आग 

ऑनलाईन टीम / पुणे  :

उरळी कांचन येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लाकडी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान अग्निशामन दलाकडून अगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील ही घटना आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अग्निशामन दलालाआग लागल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दल्याच्या गाडय़ा घटना स्थळी दाखल झाल्या. सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान,घटनास्थळी 3 सिलेंडर जवानांनी बाहेर काढले. दरम्यान साडी,लाकडी फर्निचर व भंगार तसेच जुन्या लाकडी वस्तूंच्या दुकानांना लागलेल्याने ही सर्व दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.

Related posts: