|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » ‘मूडीज’च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात उसळी

‘मूडीज’च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात उसळी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘मूडीज’ने भारताच्या रेटिंगमध्येवाढ केल्यानंतर शेअर बाजरानेही मोठी उसळी घेतली आहे.शेअर बाजरात तब्बल 400अंकाची उसळी पहायला मिळाली. आज शेअर बाजराची सुरूवात 33,388 अंकांनी झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये 100 अंकांनी वाढ झाली आहे.सेन्सेक्स 33,520 अंकांवर पोहोचला होता.

‘मूडीज’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरून बीएए2 असा बदल केला आहे. या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. ‘मूडीज’ने 2004 साली बएए 3 हे रेटिंगमध्ये दिले होते,त्यानंतर आता ते वाढवून बीएए2 करण्यात आले.या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.

Related posts: