|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » लवकरच चेकबुक इतिहास जमा होणार

लवकरच चेकबुक इतिहास जमा होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकार एका मोठा पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. सरकार जनतेला क्रेडिट व डेबिट कार्डांच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी वारंवार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे लवकरच चेकबुकची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. अशी माहिती अखिल भारतीय व्यापारी परिसंघचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देऊन सरकार कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकते आहे. एकीकडे सरकार 25 हजार कोटी रूपये फक्त नोटा छापण्यावर खर्च करत आहे,तर दुसरीकडे 6 हजार कोटी रूपये त्या नोटांच्या सुरक्षेवर खर्च होतात.त्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चाल दिल्यास सरकारच्या खार्चत मोठय़ा प्रमाणात कपात येणार आहे. परंतु सरकार जर डिजिटल व्यवहाराला चालना देत असेल तर कार्ड पेमेंटवर लागणारे शुल्कसुद्धा सरकारला बंद करावे लागेल, जेणेकरून लोक डिजिटल व्यवहार करण्याला प्राधन्य देतील,असेही प्रवीण खंडेलवाल म्हणाले.

 

Related posts: