|Friday, April 20, 2018
You are here: Home » Top News » ऊसदर आंदोलन पेटले; सहकार मंत्र्यांच्या घरासमोर फोडल्या रक्ताच्या बाटल्या

ऊसदर आंदोलन पेटले; सहकार मंत्र्यांच्या घरासमोर फोडल्या रक्ताच्या बाटल्या 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

ऊसाला दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलानाला हिंसक वळण मिळाले.सोलापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून घेतल्या.

पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान,दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडकारवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोरही आंदोलान करण्यात आले.आजपासून बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर तळ ठोकणार आहे. त्यामुळे राज्यात आता ऊस दर आंदोलान पेटल्याचे दिसत आहे.

 

Related posts: