|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » उद्योग » सौर उत्पादनांसाठी बीआयएस मानके

सौर उत्पादनांसाठी बीआयएस मानके 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

1 जानेवारीपासून देशात केवळ भारतीय मानक ब्युरोकडून परवानगी मिळालेल्या सौर उत्पादनांची विक्री होणार आहे. हे नवीन नियम सौर उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वितरणावरही लागू होतील. चीनमधून भारतात विक्री होणाऱया स्वस्त आणि दर्जाहीन उत्पादनांवर आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोलार फोटोव्होलेटिक सिस्टीम, डिव्हाईस, कंपोनेट गुड्स ऑर्डर 2017 पुननिर्मिती ऊर्जा मंत्रालयाकडून जाहरी करण्यात आला. ही अधिसूचना ऑगस्ट 2018 पासून लागू करण्यात येणार होती, मात्र आता मंत्रालयाने ती 1 जानेवारी 2018 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.

या अधिसूचनेनुसार कोणतीही व्यक्ती देशात सौर ऊर्जा उत्पादनांची निर्मिती करत असेल त्याला पहिल्यांदा मानक ब्युरोकडे नोंदणी करावी लागेल. याचप्रमाणे उत्पादनांचा साठा, विक्री आणि वितरणासाठीही नोंदणी आवश्यक आहे. विदेशातून सौर उत्पादनांची आयात करण्यात येत असल्यास मानक ब्युरोची मंजुरी घेणे गरजेचे होणार आहे.

मंत्रालयाच्या आदेशानुसार, क्रिसटलाईन पीव्ही मॉडय़ुल, थिन-फिन पीव्ही मॉडय़ुल, पीव्ही मॉडय़ुल, पॉवर कर्न्व्हटर फॉर युजन इन पीव्ही सिस्टीम, युटिलिटी-इन्टरकनेक्टेड पीव्ही इन्व्हर्टर, स्टोरेज बॅटरी यांना सौर उत्पादने समजण्यात आले आहे.

चीनला दणका…

भारतात मोठय़ा प्रमाणात सौर उत्पादनांची विक्री करण्यात येते. या उत्पादनांची गुणवत्ता योग्य नसल्याचे सरकारला त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आयात करण्यात येणारे कोणतेही उत्पादन बीआयएसच्या मानकांचे पालन करू शकत नाही. यामुळे चीनमधील उत्पादकांना गुणवत्ता सुधारावी लागणार आहे असे मंत्रालयातील अधिकाऱयाने म्हटले. भारतातील सौर ऊर्जा क्षेत्रात चीनचा हिस्सा 80 टक्के आहे. सोलार पॅनेलची गुणवत्ता योग्य नसल्याने प्रकल्पांची कामगिरी निकृष्ट आहे, याचा सरकारच्या लक्ष्यावर विपरित परिणाम होतो.

Related posts: