|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नगरपरिषदेतर्फे बाळासाहेब चिवटे यांना अभिवादन

नगरपरिषदेतर्फे बाळासाहेब चिवटे यांना अभिवादन 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

     येथील नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब उर्फ धोंडिराम चिवटे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी चिवटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मागासवर्गीय विशेष समिती सभापती संध्या बनसोडे, राजू सावंत, दिपक कोळी, सुरेश जाधव, संपत तंबिरे, शिवाजी जोगळेकर, संजय कोळी, सुरेश वाघमारे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कांबळे उपस्थित होते.