|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ऊसदर आंदोलनाचा भडका …

ऊसदर आंदोलनाचा भडका … 

पंढरपूर / प्रतिनिधी

गेल्या 20 दिवसाहून अधिक काळ सुरू असलेले सोलापूर जिल्हय़ातील ऊसदर आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. यामध्ये स्वयंस्फ्tढर्तीने शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उचलत आहेत. यामध्ये रविवारी अनेकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. रास्तारोको झाले, सभा झाल्या इतकेच काय तर अनेक ग्रामीण भागातील गावं बंद राहिली. त्यामुळे ऊसदर आंदोलनाचा ‘वणवा’ पेटलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हयात रौद्ररूप होताना दिसून येतय.

पहाटेपासून संपूर्ण सोलापूर जिल्हयात ऊसदर आंदोलनाचा भडका होता. यामध्ये पंढरपूर तालुक्यात तर ऊसदर आंदोलनाची तीव्रता सर्वाधिक दिसून आली. आज भंडीशेगाव येथे एका एसटीची तोडफ्ढाsड करून जाळण्याचा प्रयत्न झाला. तर सोनके येथे रस्त्यावर लाकडे आणि टायर टाकून जाळपोळ करण्यात आली.

आंदोलनाची सुरूवात शनिवार रात्रीपासून सुरू झाली. यामध्ये शनिवारी रात्री सातारा रस्त्यावर एसटीची तोडफ्ढाsड झाली. तर अनेकठिकाणी जाळपोळ सुरू करण्यात आली. यामध्ये रविवारी आंदोलनाची सुरूवात अनेकठिकाणच्या चावडीसभा आणि रास्तारोकोने झाली. यामध्ये बळीराजा संघटनेने भोसे पाटी येथे रास्ता रोको केला. यावेळी बळीराजाचे संस्थापक बी. जी. कोळसे पाटील उपस्थित होते.

अनेक गावामधून स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्या सभा झाल्या. यामध्ये तालुक्यातील बहुतांश गावांमधून उसतोडणी बंद करण्यात आली. तर अनेकठिकाणी संपूर्ण गावच ऊसदरासाठी बंद करण्याचा प्रसंग आला. सकाळी दहाच्या सुमारास सोनके येथे रास्तारोको करण्यात आला. यामध्ये लाकडाचे ओंडके व टायर टाकून पेटवून देण्यात आली.

यानंतर काही काळामधेच भंडीशेगाव येथे अकलूज-सोलापूर(एमएच 14 बीटी 0971) या बसवर दगडफ्sढक करण्यात आली. यामध्ये बसच्या समोरच्या बाजूवर डिझेल टाकून बस पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रसंगावधान साधून बस आगीपासून वाचवण्यात यश आले.

दुपारपासून उसदर आंदोलनाचा भडका अधिकच वाढत होता. अनेकठिकाणी 2700 रूपयांच्या मागणीसाठी शेतकरी आग्रही होते. यामधे पटवर्धन कुरोली, सोनके, उपरी, तारापूर, वाडीकुरोली, गादेगाव आदी भागात आंदोलने झाली.

   या संपूर्ण घडामोडीमध्ये पोलिसांची तारेवरची कसरत झाली. कारण एका ठिकाणी बंदोबस्त असताना अचानक दुसरीकडे काहीतरी घटना घडत होती. त्यामुळे पोलिसांची धावपळ आणि दमछाक झालेली दिसून येत होती.

 रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सध्या संपूर्ण तालुक्यामधे फ्ढिरत आहेत. यामधे तुपकरांमुळे आंदोलनाची धग वाढत आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात सध्याच्या आंदोलनातील तुपकर एक केंद्रबिंदू होत आहेत. म्हणूनच पोलिस खात्यांकडून रविकांत तुपकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

   आंदोलनाची झळ एसटीला…

उसदर आंदोलनामधे शनिवारी रात्री एसटीची तोडफ्ढाsड झाली. यानंतर एसटीप्रशासनाने काहीकाळ एसटी सेवा बंद केली होती. यामधे ग्रामीण एसटीबस सेवा तर बंदच आहे. तसेच पुणे, अकलूज, सांगोला आदी भागाकडे देखिल जाणाऱया एसटीबस सेवाही बंद करून तुरळक प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवाश्यांची मोठी तारांबळ उडाली होती. त्यानंतर पहाटेपासून काही एसटी बसेस  बंदोबस्तामधे पाठविण्यात आल्या आहेत.

 सरकारने तात्काळ विनाकपात शेतकऱयांना त्यांच्या हक्कांचे पैसे द्या. तसेच उसाच्या वजनकाटा मारला जातो. त्यामुळे उसाचे वजन बाहेर व्हावे. सध्या आपण सोनके ग्रामस्थाच्या वतीने उसदर आंदोलनास आणि शेतकरी संघटनास पाठींबा देत आहे.

Related posts: