|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » शाओमी भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

शाओमी भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतातील स्टार्टअपमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत देशातील 100 स्मार्टअपमध्ये ही गुंतवणूक करण्यात येईल. स्मार्टफोनसाठी ऍप निर्मिती करणाऱया कंपन्यांत ही गुंतवणूक असेल कंपनीचे व्यवस्थापकीय प्रमुख लुई जून यांनी म्हटले.

शाओमी आणि उपकंपनी असणाऱया शुनवेई कॅपिटलने हंगामा आणि क्रेझीबी यांसह सहा कंपन्यांतील हिस्सेदारी खरेदी केली आहे. आर्थिक तंत्रज्ञान, मजकूर, हायपरलोकल सर्व्हिसेस, मोबाईल फोन दुरुस्ती, मोबाईल इंटरनेटच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱया कंपन्यांत गुंतवणूक करण्यात येईल. गेल्या चार वर्षात कंपनीने चीनमधील 300 कंपन्यात 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनमध्ये यशस्वी ठरलेले मॉडेल भारतामध्ये राबविण्यात येईल. शाओमीच्या व्यवसाय मॉडेलमध्ये सर्व प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यात आल्याने गेल्या सात वर्षात कंपनीने भरारी घेतल्याचे त्यांनी म्हटले.

जगातील सर्वात मौल्यवान खासगी तंत्रज्ञान कंपन्यामध्ये शाओमीचा समावेश आहे. भारतातील गुंतवणुकीबाबत अलिबाबा गुप होल्डिंग आणि टेन्सेन्ट होल्डिंग यानंतर शाओमीचा क्रमांक लागतो. 2014 मध्ये भारतात प्रवेश केलेल्या कंपनीचा स्मार्टफोनमधील हिस्सा 23.5 टक्के आहे. तीन महिन्यापूर्वी हा 17 टक्के होता. 60 देशात स्मार्टफोन विक्री करणाऱया कंपनीची चीनव्यतिरिक्त भारत ही मोठी बाजारपेठ आहे.

Related posts: