|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार ; डीएसके

मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार ; डीएसके 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘आम्ही सगळय़ांचे पैसे परत देणार आहोत, एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही, मी विजय मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार,काही अडचणी होत्या पण सर्वांना पैसे परत मिळणार,’ असे आश्वासन बांधकाम व्यवसायिक डि.एस.कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयनो डिएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर हायकोर्टाने डिएसकेंना 23 नोव्हेंबरपर्यंत जामीनाची मुदत वाढ करून मोठी रक्कम जमा करण्यास सांगितली .त्यानंतर आज पहिल्यांदाच डिएकेंनी माध्यमांशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी आम्ही सगळय़ांचे पैसे परत देणार असल्याचे आश्वासन दिले.

 

Related posts: