|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्नाटक राज्य हमाल कामगार फेडरेशनचे आंदोलन

कर्नाटक राज्य हमाल कामगार फेडरेशनचे आंदोलन 

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी हमाल कामगारांनी विविध मागण्यांसाठी हलगा येथे धरणे आंदोलन छेडले होते. कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या. या धरणे आंदोलनात बेळगाव येथील एपीएमसीमधील कामगारांनी काम बंद करून सहभाग घेतला होता. त्यामुळे एपीएमसीचे दोन्ही प्रवेशद्वार दिवसभर बंद राहिले, तसेच कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.

कामगार खात्यात सध्या सुरू असलेल्या कायक निधीअंतर्गत 60 वर्षांनंतर निवृत्त होणाऱया हमाल कामगारांना अंगणवाडी कर्मचाऱयांप्रमाणे 50 हजार रुपयांचा निवृत्ती परिहार देण्यात यावा, नोंदणीकृत कामगारांना उपचारासाठी सरकारी इस्पितळे अथवा सरकार पुरस्कृत खासगी इस्पितळात विविध योजनेंतर्गत संधी देण्यात यावी, सरकारच्या आरोग्य खात्याच्या आरोग्य विमा योजनेंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी या कामगारांना कोणतीच योजना लागू करण्यात आलेली नाही. यासाठी मोफत उपचारासाठी योजना लागू करण्यात यावी, हमाली कामगारांच्या मुलांसाठी विद्यार्थी वेतन देण्यात यावे, आम आदमी योजनेत समावेश असणाऱया कामगारांच्या मुलांना बारावीपर्यंत विद्यार्थी वेतन मिळत आहे. मात्र, बारावीनंतर शिकणाऱया मुलांसाठी कायक निधी योजनेत उच्च शिक्षणासाठी वार्षिक 10 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आम आदमी बिमा योजनेंतर्गत मृत्यू परिहार तसेच विद्यार्थी वेतन वेळेवर देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागणीचे निवेदन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सादर करण्यात आले. दरम्यान, आमदार कोनरेड्डी यांनी या आंदोलनास आपला पाठिंबा व्यक्त केला. या धरणे आंदोलनात बेळगावसह राज्यातील एपीएमसीमधील असंख्य कामगारांनी भाग घेतला होता.

Related posts: