|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात आयकर अधिकाऱयाचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात आयकर अधिकाऱयाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे आयकर अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास भरधाव तवेरा गाडीने रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. हा अपघात देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरजाई मंदिराजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनूसार, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून येत होते.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर उभा होता. तवेरा चालकाला याचा आंदाज आला नाही.भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली.यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे जखमी झाले आहेत. अभिषेक त्यागी असे मृताचे नाव असून ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यकरत होते,असे सांगण्यात येत आहे.

 

 

 

Related posts: