|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » मध्यप्रदेशच्या शाळांमध्ये आता ‘पद्मावती’चे धडे

मध्यप्रदेशच्या शाळांमध्ये आता ‘पद्मावती’चे धडे 

ऑनलाईन टीम / भोपाळ  :

मध्यप्रदेशमधील शाळांमध्ये आता राणी ‘पद्मावती’च्या बलिदानाची काहाणी शिकवली जाणार असल्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

उज्जैनमधील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.‘पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराणी पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल,राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावे लागणार नाही, तसेच त्यामुळे येत्या पिढीला खरा इतिहास समजण्यास मदत होईल, असे चाहान यांनी सांगितले.यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यची घोषणा केली होती.त्यानंतर आत राणी पद्मावतीच्या शौर्याची व बलिदानाची काहाणी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Related posts: