|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » अनिकेत कोथळे प्रकरण ; सांगलीच्या पोलीस अधीक्षक,उपअधीक्षकांची बदली

अनिकेत कोथळे प्रकरण ; सांगलीच्या पोलीस अधीक्षक,उपअधीक्षकांची बदली 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ.दिपाली काळे यांची बदली करण्यात आली.

दत्तात्रय शिंदे यांच्याकडे राज्य राखीव दलाच्या समादेशकपदाची जबाबदारी देत त्यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. उपअधीक्षक पदावर काम करत असलेल्या डॉ.दिपाली काळे यांच्याकडे सोलापूर शहर उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपअधीक्षकपदी अशोक विरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झालेले सुहैल शर्मा सध्या कोल्हापूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर उपअधीक्षक पदावर नेमणूक झालेले अशोक वीरकर सध्या नांदेडमधील देगलूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत.