|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते आज झर्ये पाझर तलावाचे भुमिपुजन

जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते आज झर्ये पाझर तलावाचे भुमिपुजन 

ग्रामस्थांच्या 37 वर्षांच्या प्रयत्नांना यश

मोठय़ा प्रमाणात जमिनी येणार ओलिताखाल़ी

प्रतिनिधी /लांजा

राजापूर तालुक्यातील झर्ये धनगरवाडी येथील पाझर तलावाचा भुमिपुजन सोहळा शुक्रवार सकाळी 10़ वाजता जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आह़े या पाझर तलावामुळे येथील ग्रामस्थांची 37 वर्षाची मागणी पुर्णत्वाला आली असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात जमीन ओलीताखाली येणार आहे.

या पाझर तालावाच्या भुमिपूजन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री रविंद्र वायकर, खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, आमदार राजन साळवी, आमदार ऍड़ पराग अळवणी, माजी आमदार गणपतराव कदम, रत्नागिरी जिल्हा परीषद अध्यक्षा स्नेहा सावंत, महाराष्ट्र राज्य जलसंधारण सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त ड़ॉ जगदीश पाटील, रत्नागिरी जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी पी प्रदीप, झर्ये ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या कार्याध्यक्षा स़ौ राजश्री (उल्का) विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़

राजापूर तालुक्यातील झर्ये गाव व परीसरातील नागरीकांना प्रत्येकवर्षी उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत़ो टंचाईच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झर्ये येथे पाझर तलाव व्हावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होत़ी झर्ये ग्रामस्थ मंडळ मुंबई व मंडळाच्या कार्याध्यक्ष उल्का विश्वासराव यांनी विलेपार्लेचे आमदार ऍड़ पराग अळवणी व माजी आमदार बाळ माने यांच्या प्रयत्नातून तालुका, जिल्हा व मंत्रालयापर्यंत पाझर तलावासाठी पाठपुरावा केला गेला होत़ा अखेर ग्रामस्थांच्या 37 वार्षाच्या पाठपुराव्याला यश आले आह़े

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या पाझर तलावाचे भुमिपुजन होत आहे. या पाझर तलावामुळे लांजा तालुक्याच्या पुर्वेला असणाऱया झर्ये परीसरातील जमीनी ओलिताखाली येणार आहेत़ पाणी साठय़ामुळे शेती-फळबाग, दुग्ध व्यवसाय, पर्यटन व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आह़े

Related posts: