|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऍथलेटिक्स, हॉकी स्पर्धेला प्रारंभ

ऍथलेटिक्स, हॉकी स्पर्धेला प्रारंभ 

क्रिडा प्रतिनिधी /बेळगाव :

महाकाली एज्युकेशन सोसायटिच्या फिनिक्स पब्लीक रेसिडेन्सियल स्कूल (होनगा) आयोजित 21 वी फिनिक्स संस्थापण ऍथलेटिक्स-हॉकी सप्ताह क्रिडा महोत्सवाला शुक्रवार पासून मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.

उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून बेळगाव राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या ऍडम ऑफिसर मेजर शामली आर्या, जे. सी. तप्पन, प्राचार्या नंदिनी सडेकर, प्राचार्य विजय सरगन्नावर उपस्थित होते.

प्रारंभी संज्योता होसमनी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख्य पाहूण्या मेजर शामली आर्या यांच्या हस्ते क्रिडाध्वज फडकावून क्रिडामहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रिडापटु रूविन जॉन याने मैदानाभोवती क्रिडा ज्योत फिरवून मान्यवरांच्या हाती सोपविले. तर शिवशंकर गुडीन्नावर याने शपथ देवविली.

याप्रसंगी स्पर्धा सेक्रेटरी अनिता चौगुले (गुरव), वंदना कुलकर्णी, गीता मॅडम आदि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

उद्घाटन समारंभानंतर अखिल भारतीय आंतर शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या रेणूका फिरता चषक हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेला प्रारंभ झाला. आजच्या पहील्या दिवशी जीएमपी स्कूल (मडकेरी), डीवायईएस (धारवाड), न्यू इंग्लीश स्कूल (नुल), फिनिक्स स्कूल (बेळगाव), सहार्शार्जुन प्रशाला (सोलापूर) व सेंट ऍन (पुणे) यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी मिळविला.

Related posts: