|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जीएसटी महसुलात 12 टक्के वाढ

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जीएसटी महसुलात 12 टक्के वाढ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर कायदा लागू होउढन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल़ा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याच्या कर संकलनाचा आढावा घेण्यात आला असता सुमारे 12 टक्क्यापर्यंत जादा संकलन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल़ा तर पेंद्रीय कर विभागाच्या नोंदीत करदाता संख्येत साडेतीन हजारवरून 8 हजारपर्यंत वाढ झाली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े

वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर पहिली तिमाही संपल़ी या कालावधीत अनेक मुद्दे पुढे आल़े वकिली सेवेसारख्या अनेक सेवा या कायद्याच्या अंतर्गत आल्य़ा याशिवाय 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांना नोंदणी करणे अपरिहार्य ठरल़े यापूर्वी पेंद्रीय कर असलेल्या सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाकडे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील साडेतीन हजार उद्योजक नोंदकृत होत़े त्यांची संख्या 8 हजारपर्यंत वाढल़ी

राज्य व केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कराचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील नेंदणीकृत विक्रेत्यांची संख्या 16 हजारपर्यंत पाहोचली आह़े यातील निम्मे व्यापारी राज्य कराखाली तर निम्मे पेंद्र कराखाली नेंदणीकृत होण्याचे वर्गीकरण निघेल, असा अंदाज कर हाताळणी करणाऱया वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केल़ा पेंद्रीय करदात्या संख्येत 128 टक्के एवढी वाढ झाली आह़े

आणखीही काही आकडेवारी यानिमित्ताने पुढे आली आह़े जीएसटी कायद्याप्रमाणे प्रत्येक राज्यात एक या प्रमाणे सेंट्रल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून एकेका ठिकाणाची नोंद करणे प्रत्येक उद्योजकाला आवश्यक ठरत़े त्या ठिकाणाहून राज्यातील सर्व उलाढालीवर कर भरला जाऊ शकत़ो राज्यातील अन्य ठिकाणच्या उलाढालीसाठी एकाच पेंद्राद्वारे कर भरून चालत़ो या तरतुदीचा लाभ कोकणातील पहिल्या 10 कर भरणाऱया कंपन्यांपैकी 6 जणांनी घेतल़ा

फिनोलेक्स इंडस्ट्री यापूर्वी उत्पादन व सेवाशुल्क रत्नागिरी कार्यालयात जमा करत होत़ी याशिवाय अल्ट्राटेक, हिंदुस्थान युनिलिव्हर, कंन्साई नेरोलॅक, ऑक्टेल, जॉर्ज फिशर या ही कंपन्या रत्नागिरी कार्यालयात कर जमा करत होत्य़ा आता फिनोलेक्सने पुणे, अल्ट्राटेकने नागपूर, हिंदुस्थान युनिलिव्हरने नागपूर, कंन्साई नेरोलॅक, ऑक्टेल, जॉर्ज फिशर या सर्वांनी मुंबई हे आपले सेंट्रल प्लेस ऑफ बिझनेस असल्याचे जाहीर केल़े यामुळे राज्यातील सर्व उलाढालींवर त्या-त्या शहरातून कर भरला जात आह़े रत्नागिरीत या कंपन्यांच्या कारखान्यात वस्तू बनत असल्या तरी त्यांचा कर रत्नागिरी कार्यालयात जमा होत नसल्याने रत्नागिरी कार्यालयातील जमा रकमा कमी झाल्या आहेत़

जीएसटीमुळे किंमत वाढ होण्याचे कोणतेही कारण नाह़ी तसे झाल्यास लेखी तक्रार ग्राहकांनी करावी, असे आवाहन करण्यात आले आह़े कोणत्याही उद्योजकाला जीएसटीविषयी प्रश्न असेल तर त्यांनी केंद्र, राज्य जीएसटी विभागाच्या कार्यालयातील मदत कक्षात संपर्क कराव़ा व्यावसायिकांच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे आवाहन अधिकाऱयांनी केले आह़े

Related posts: