|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी 

प्रतिनिधी/ पणजी

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सोमवारी येथील सत्र न्ययालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळ्यास कामत यांना अटक अटळ आहे. खाण घोटाळा प्रकरणात कामत यांच्या विरोधात एसआयटीने चौकशी सुरु केली आहे. अटक होणार या भीतीने कामत यांनी अटकपूर्व जामीनासाठी येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.   

खाण घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी कामत यांना ताब्यात घेण्याकरता गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पूर्ण तयारी केली होती. एसआयटी अधिकारी कामत यांच्या घरी गेले होते मात्र ते बेपत्ता झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मात्र कामत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज येथील सत्र न्यायालयात दाखल केला. दरम्यान कामत यांना अंतरिम जामीन मंजूर झाला होता. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

 खाणमालक प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण केल्याने सरकारचा कोटय़वधी रुपयांचा निधी बुडाला आहे. खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीने 2014 साली दिगंबर कामत, प्रफुल्ल हेदे तसेच खाण खात्याच्या काही अधिकाऱयांविरोधात गुन्हा नोंद केला होता. गेल्या काही दिवसांपासून एसआयटीने खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासकामाला गती दिली असून खाण खात्याचे माजी मुख्य सचिव राजीव यदुवंशी यांची तब्बल पाच दिवस उलटतपासणी केली होती. यदुवंशी यांनी कामत यांच्या विरोधात एसआयटीला महत्वाची माहिती दिल्याने एसआयटीने कामत यांना ताब्यात घेण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. दरम्यान कामत यांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आज त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार आहे.   

 

 

 

 

Related posts: