|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सरकारला संविधानदिनाचा विसर : अशोक मोरे

सरकारला संविधानदिनाचा विसर : अशोक मोरे 

 पिंपरी / प्रतिनिधी :

भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. मात्र, फडणवीस सरकारला त्याचा विसर पडला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांनी रविवारी येथे केली. जातीयवादी संघटनांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील आंबेडकरनगर येथे ‘संविधान गौरवदिन’ मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महासचिव अशोक मंगल, काँग्रेस नेत्या निगारताई बारस्कर, राजेश नायर, कार्यक्रमाचे आयोजक शहराध्यक्ष उमेश बनसोडे, अर्जुन शिवाजी गायकवाड व अन्य उपस्थित होते.

मोरे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 26 नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिवस साजरा करण्याचा जीआर 27 नोव्हेंबरचा दिनांक टाकून काढला. 26 ला रविवार आला म्हणून असे करायचे का? 15 ऑगस्ट हा दिवस सुट्टीच्या दिवशी आला, तर दुसऱया दिवशी 16 ऑगस्टला स्वातंत्र्यदिवस साजरा करणार का? म्हणूनच या मनुवादी व्यवस्थेचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

26/11 तील हुतात्म्यांना श्रद्धांजली

26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस तसेच नागरिकांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related posts: